रामटेक: मनसर जंगल शिवारात मिळाला वृद्ध व्यक्तीचा मृतदेह
Ramtek, Nagpur | Jun 8, 2026 नागपूर - जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील मनसर जंगल शिवारात एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह मिळाल्याने खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीप्रमाणे कृष्णा चौधरी वय 77 वर्ष राहणार वाहिटोला असे मृतकाचे नाव असून तो मागील दोन दिवसांपासून लापता असल्याचे कळते. रविवारला सायंकाळी गुराख्याला हा मृतदेह दिसला. त्याने याची सूचना पोलिसांना दिल्यानंतर कारवाई करण्यात आली.