जालना: जालना शहरात नशेच्या गोळ्यांचा साठा जप्त; कारसह 4 लाख 98 हजारांचा मुद्देमाल ताब्यात
Jalna, Jalna | Sep 4, 2026 जालना शहरात नशेसाठी वापरल्या जाणार्या औषधी गोळ्यांची विक्री करण्याच्या संशयावरून सदर बाजार पोलिसांनी पहाटे कारवाई केली. या कारवाईत एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून नायट्राझेपाम गोळ्यांच्या 17 पट्ट्या, तीन भ्रमणध्वनी आणि एक होंडा सिटी मोटार असा एकूण 4 लाख 98 हजार 360 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शुक्रवार दि. 4 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन वासुदेव सानप यांनी केली.