अमरावती: डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे व चुकीच्या उपचाराने इंजिनीयर तरुणाचा मृत्यू,जिल्हा सामान्य रुग्णालयात नातेवाईकांचा रोष
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आणि चुकीचा उपचार केल्याने इंजिनीयर असलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला.दीपक रमेश आठवले (वय 35 )रा. आदिशक्ती अपार्टमेंट गणपती नगर असे मृत तरुणाचे नाव आहे.गणपती नगरात राहणारा दीपक आठवले हा अभियंता म्हणून कार्यरत होता. दरम्यान या प्रकरणात मृत युवकाची आई शोभा आठवले यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात 15 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता तक्रार दिली असून पुढील तपास पोलीस करत आहे.