पालघर: आगाशी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक संपन्न
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आगाशी येथे पक्षाच्या सर्वसाधारण बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत आगामी महापालिका निवडणुका पक्ष बांधणी संघटना बांधणी आदींसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रवीण मात्रकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाल. या बैठकीस वसई तालुकाप्रमुख प्रथमेश राऊत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आगाशी परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.