पालघर: जिल्ह्यात नायलॉन मांजा विक्री व वापर करणाऱ्या १० जणांवर विविध पोलिसांत गुन्हा दाखल
मिरा भाईंदर वसई विरार पोलिस आयुक्तालयात पतंग उडविण्यासाठी लागणारा नायलॉन मांजा निर्मिती, विक्री आणि वापर करण्यासाठी बंदी असतानाही विक्री करणाऱ्या दुकानदारांसह वापर करणाऱ्यांवर आचोळे, माणिकपूर, तुळींज, वालीव, नायगाव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. वालीव येथे महावीर जैन, तुळींजला ममिता इंगोले, माणिकपूर मध्ये करण बोरीचा, निखिल वैती, फरहान शेख, राहुल राठोड, साई पाटील आणि १७ वर्षीय मुलगा, आचोळ्यात विकास कानडे तर नायगाव मध्ये जेठाराम चौधरी यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत