रोहा: उन्हाळी सुट्टीसाठी रायगडात 41 जादा एसटी बसेस
Roha, Raigad | May 1, 2026 नुकत्याच शाळा, महाविद्यालयांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर झाल्या असून या सुट्टीच्या काळात अनेक पालक मुलांना सुट्टी पडली असल्याने आपापल्या गावी जाणे पसंत करत असतात. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील रायगड एसटी आगाराने जवळपास 41 जादा बसेसची व्यवस्था केली आहे. या बसेसच्या माध्यमातून 15 एप्रिल ते 15 जून या दोन महिन्यांच्या कालावधीत तब्बल 19 हजार किलोमीटरचा प्रवास केला जाणार आहे.