रामटेक: जनसंपर्क कार्यालय रामटेक येथे राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल यांचे जन्मदिनी अभिष्टचिंतन
Ramtek, Nagpur | Apr 3, 2026 राज्याचे राज्यमंत्री तथा रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार एड.आशिष जयस्वाल यांचे जन्मदिनी शुक्रवार दिनांक 3 एप्रिलला त्यांचे जनसंपर्क कार्यालय रामटेक येथे सकाळपासूनच अभिष्टचिंतन कार्यक्रम सुरू आहे. राज्यमंत्री एड जयस्वाल यांचे सकाळी त्यांच्या पत्नी सौ. पल्लवी जयस्वाल यांनी औक्षण केले. यानंतर जनसंपर्क कार्यालय रामटेक येथे त्यांचे जन्मदिनी हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा देणाऱ्यांची रांग लागली.