नरखेड: काटोल नरखेड विधानसभा क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा बसचालकांची विशेष बैठक
नागपूर ग्रामीण जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष पावले उचलण्यात आली आहेत.पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार आणि अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढाळी पोलीस स्टेशन अंतर्गत विविध शाळांमधील बसचालक, वाहक आणि शाळा प्रतिनिधींच्या बैठका घेण्यात आल्या..