अंबरनाथ: बदलापूर येथे बिल्डरकडून नागरिकांची फसवणूक, पैसे भरुनही पाणी दिले जात नसल्याची नागरिकांची तक्रार #Jansamasya
बदलापूर येथे बिल्डरकडून नागरिकांची फसवणूक झाल्याचं उघड झालं आहे. नागरिकांना इमारतीत एमआयडीसीकडून पाणी पुरवठा केला जाईल असं सांगून बिल्डरने प्रत्येक फ्लॅटमागे एक लाख रुपये घेतले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आज दिनांक २८ मार्च रोजी सकाळी ११ सुमारास एमआयडीसी कार्यालयात धडक दिली असता बिल्डरने पैसे भरले नसल्याचं उघड झालं आहे.