बुलढाणा: शहरातील टिकार बुक सेंटर समोरून दुचाकी लंपास, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
शेलगाव काकडे येथील जानकीराम परशराम आवळे यांनी बुलडाणा शहरातील टिकार बुक सेंटर समोर २६ ऑक्टोंबर रोजी दुचाकी क्र.एम.एच.२८ बी.ई. १११८ किंमत ७५ हजार रुपये ही उभी करुन बाजार करण्यासाठी गेले. परत आले असता त्यांना दुचाकी दिसून आली नाही. त्यांनी आजुबाजूच्या परिसरात शोध घेतला असता दुचाकी दिसून आली नाही.याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध बुलढाणा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.