शहादा: नंदुरबार विरल विहार येथे खा.डॉ हिना गावित यांच्या हस्ते शहादा तालुक्यातील ग्रा.पं सरपंचांना कामांचे प्रशासकीय पत्र वाटप
नंदुरबार येथील विरल विहार येथील खासदार डॉ. हिना गावित यांच्या निवासस्थानी शहादा तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच व विविध गावातील पदाधिकाऱ्यांना विविध कामांचे प्रशासकीय मान्यता पत्र खासदार डॉ.हिना गावित व जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित आणि जिल्हा परिषदेच्या सभापती हेमलता शितोळे यांच्या उपस्थितीमध्ये आज दिनांक 21 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास वाटप करण्यात आले याप्रसंगी शहादा तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीचे सरपंच व पदाधिकारी उपस्थित होते.