रामटेक: वाहीटोला येथील हिट अँड रन प्रकरणाचा 24 तासात रामटेक पोलिसांनी लावला छडा; आरोपी चालकासह वाहन जेरबंद
Ramtek, Nagpur | Jun 29, 2026 रामटेक पोलिसांनी तांत्रिक व कौशल्यपूर्ण तपासाच्या बळावर वाहीटोला येथे रविवारी दुपारी झालेल्या प्राणघातक अपघाताच्या अवघ्या 24 तासात उलगडा करत आरोपी चालकासह अपघातग्रस्त वाहनाचा शोध लावला आहे. तपासादरम्यान 29 जूनला आरोपी राजेश छोटेलाल लाड वय 57 वर्ष रा. मानवनगर टेका नाका नारी रोड नागपूर याने एम एच 40 ए 67 22 क्रमांकाच्या वाहनाने अपघात केल्याचे निष्पन्न निघाले आहे. रामटेक पोलिसांनी आरोपी व संबंधित वाहन ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.