कळमेश्वर: एसटीचा 78 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा, वृक्षारोपण करत बस स्थानकातील स्वच्छतेची व सुविधांची प्रत्यक्ष पाहणी
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमास उपस्थित राहून वृक्षारोपण केले. तसेच बस स्थानकाची पाहणी करून प्रवाशांना अधिक सुरक्षित, स्वच्छ व दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आवश्यक बाबींचा आढावा घेण्यात आला. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.