हिंगणा: वानाडोंगरी येथून जबरी चोरी व खंडणी मारणाऱ्या आरोपींना करण्यात आले अटक एमआयडीसी पोलिसांची कारवाई
Hingna, Nagpur | Mar 16, 2026 लेंजड रेस्टॉरेन्ट अॅन्ड बार, संगम रोड, येथे कुख्यात व आजन्म कारावासाची शिक्षा भोगत असलेला व मागील बरेच कालावधी पासुन पॅरोल वरून फरार असणारा आरोपी अजीत रमेश सातपुते, याने त्याचे इतर सहा साथिदारांसह बार मधे जावुन, तेथील बार मॅनेजर यास जवळील बंदुकीचा धाक दाखवुन, तसेच बार मालकास फोनवर खंडणी मागुन, बारच्या गल्ल्यातील अं. २०,०००/- रू तसेच बारच्या डिस्प्ले काउंटर ला लावलेल्या विविध महागडया विदेशी दारूच जबरीने चोरून नेल्या होत्या.