रामटेक: गावात दारूबंदी करण्यासाठी करवाही येथील सरपंचासह महिलांचा देवलापार पोलिसांविरुद्ध एल्गार
Ramtek, Nagpur | Jun 9, 2026 पोलीस स्टेशन देवलापार अंतर्गत येणाऱ्या करवाही येथील अवैध दारूबंदी करण्यासाठी आंदोलन करीत महिलांनी गट ग्रामपंचायत भवन करवाही समोर आठ जूनला दुपारी प्रचंड नारेबाजी केली १०० च्या वर महिलांनी रॅली काढून देवलापार पोलिसांना मागणीचे निवेदन दिले. या आधी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेण्यात आली.