रामटेक: पवनी जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट जखमी
Ramtek, Nagpur | Jul 28, 2026 नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 पुढील माता मंदिर परिसरात मागील 14 जुलैला अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबटचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत असतानाच 13 दिवसानंतर सोमवार दिनांक 27 जुलैला रात्री अकरा ते साडेअकरा वाजता च्या दरम्यान याच परिसरात पुन्हा एक बिबट अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झाल्याची घटना घडली आहे.