महाराष्ट्राचे आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अभियान संचालक मा. श्री. संजय काटकर (भा.प्र.से.) यांनी उत्तर प्रदेशातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील नाविन्यपूर्ण उपक्रमांचा अभ्यास करण्यासाठी लखनौ येथे अधिकृत आभ्यास दौरा केला
2.6k views | Gondia, Maharashtra | Jul 19, 2026 मुंबई/पुणे, दि.१८ : महाराष्ट्राचे आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अभियान संचालक मा. श्री. संजय काटकर (भा.प्र.से.) यांनी उत्तर प्रदेशातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील नाविन्यपूर्ण उपक्रमांचा अभ्यास करण्यासाठी लखनौ येथे अधिकृत अभ्यास दौरा केला. या दौऱ्यात अत्याधुनिक रुग्णालये, डिजिटल आरोग्य व्यवस्थापन, Behaviour Change Communication (BCC) प्रशिक्षण, HOPE केंद्रीकृत नियंत्रण कक्ष तसेच उत्तर प्रदेश राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून दोन्ही राज्यांतील सर्वोत्तम कार्यपद्धतींची देवाणघेवाण करण्यात आली.