मंठा: भुवन रेती घाटावर ‘माफियांचीच मर्जी’, तहसीलदार गंधारीच्या भूमिकेत!
(जिल्हाधिकारी मॅडम आता तरी लक्ष घालणार का?)
Mantha, Jalna | Apr 21, 2026 भुवन रेती घाटावर ‘माफियांचीच मर्जी’, तहसीलदार गंधारीच्या भूमिकेत! (जिल्हाधिकारी मॅडम आता तरी लक्ष घालणार का?) आज दिनांक 21 मंगळवार रोजी संध्याकाळी सात वाजता मिळालेल्या माहितीनुसार मंठा तालुक्यातील भुवन येथील वझर–सरकटे रेती घाटावर सुरू असलेला अवैध वाळू उपसा आता उघड दादागिरीपर्यंत पोहोचला असून, शेकडो तक्रारी, ठोस पुरावे आणि वारंवार प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांनंतरही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासनाप्रति अविश्वास निर्माण झाला असुन संताप वाढत आहे.