रोहा: मध्य रेल्वेकडून कोकणवासियांना दिलासा
Roha, Raigad | May 17, 2026 मुलांना शाळेची उन्हाळी सुट्टी पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात कोकणवासीय आपल्या गावी जात आहेत. परंतु मोठ्या प्रमाणात रेल्वे बस खाजगी बसेस यांना गर्दी दिसत असल्यामुळे प्रवाशांना दगड होताना दिसत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या मागणीनुसार रेल्वे कोकण मार्गावर १० अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवणार आहे. याचा फायदा कोकणवासीयांना होणार असल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. ८ गाड्या सावंतवाडीसाठी आणि २ गाड्या मडगावसाठी चालवण्यात येणार आहेत.