रामटेक: मोरफाटा उड्डाणपुलाखाली सर्विस रोडवर फेकल्या मेलेल्या कोंबड्या
Ramtek, Nagpur | Apr 5, 2026 नागपूर - जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर रामटेक तालुक्यातील पोलीस स्टेशन देवलापार अंतर्गत येणाऱ्या मोरफाटा जवळच्या उड्डाण पुलावरून खाली असलेल्या सर्विस रोडवर मृत कोंबड्या अस्त व्यस्त पसरलेल्या दिसल्याने हे कृत्य कोणी केले याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मार्गावर मृत्यू कोंबड्यांचा सडा पडलेला होता.5 एप्रिल ला सकाळी 11 वाजताच्या दरम्यान या मार्गावर मृत कोंबड्या मोठ्या संख्येने सर्वत्र अस्तव्यस्त पडलेल्या होत्या.