पनवेल: महिलांचा सन्मान, कुटुंबाची स्थिरता आणि मुलांचे भविष्य हे दुर्लक्षित करून कोणतीही व्यवस्था मजबूत होऊ शकत नाही – आ. वाघ
Panvel, Raigad | Mar 30, 2026 कायदा आणि नैतिकता वेगवेगळी असू शकतात, पण समाज या दोघांच्या समतोलावरच टिकतो. जेव्हा निर्णय नातेसंबंधांची पायाभरणीच कमकुवत करू लागतात, तेव्हा प्रश्न विचारणे गरजेचे ठरते. महिलांचा सन्मान, कुटुंबाची स्थिरता आणि मुलांचे भविष्य हे दुर्लक्षित करून कोणतीही व्यवस्था मजबूत होऊ शकत नाही. कायदा जर संवेदनांपासून दूर गेला, तर न्याय अपूर्ण राहतो. म्हणून अशा विषयांवर व्यापक चर्चा आणि पुनर्विचार होणे अत्यंत आवश्यक आहे. अशी प्रतिक्रिया भाजप महिला प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चित्रा किशोर वाघ यांनी दिली.