भिवापूर: भिवापूरच्या विकासाला गती देण्यासाठी मुंबईत हालचाली; अंतिम मंजुरीसाठी निवेदन
आज श्रीमती माधुरी मिसाळ राज्यमंत्री नगर विकास विभाग महाराष्ट्र राज्य यांची आमदार डॉ राजीव पोतदार यांनी भेट घेऊन नगरपंचायत भिवापूरच्या प्रलंबित प्रारुप विकास आराखड्यास तातडीने अंतिम मंजुरी मिळावी यासाठी सविस्तर निवेदन सादर करण्यात आले नगरपंचायत भिवापूरचा प्रारूप विकास आराखडा मंजुरीसाठी शासनाकडे सादर करण्यात आलेला असून प्रदीर्घ कालावधी उलटूनही अंतिम मंजुरी मिळालेली नाही