पांडुर्णा: आरोग्य उपकेंद्रातर्फे विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती व मार्गदर्शन शिबिर संपन्न
ठिकाण: उपकेंद्र पांडुर्णा
1k views | Nanded, Maharashtra | Aug 23, 2026 जंतसंसर्ग जनजागृती: डॉ. जगदीश राठोड यांनी विद्यार्थ्यांना जंतसंसर्गापासून बचाव व वैयक्तिक आरोग्याची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले. जलजन्य आजार व प्रात्यक्षिक: पावसाळ्यात दूषित पाणी व अस्वच्छतेमुळे होणारे आजार रोखण्यासाठी श्री. साईनाथ माकूरवार यांनी विद्यार्थ्यांना हात धुण्याचे योग्य प्रात्यक्षिक दाखवले. किशोरी आरोग्य मार्गदर्शन: 11 ते 19 वयोगटातील विद्यार्थिनींना किशोरावस्थेतील शारीरिक, मानसिक व भावनिक बदलांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. उपस्थिती: शिबिरास शिक्षकवृंद, आशा सेविका, आरोग्य कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. #Pandhurna #HealthAwareness #PublicNews #ArogyaVibhag #HealthEducation #MaharashtraNews