नरखेड: कोठडीत तरुणाचा मृत्यू झाल्याचा संशय, संतप्त नातेवाईकांनी लावला गंभीर आरोप
Narkhed, Nagpur | Apr 30, 2026 नरखेड येथील अंबाडा देशमुख गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ३६ वर्षीय तरुणाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याचा खळबळजनक दावा त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी कुटुंबीयांनी संताप व्यक्त करत हा मृत्यू नसून हत्या असल्याचा गंभीर आरोप पोलीस प्रशासनावर लावला आहे.