मंठा: मंठ्यात अवैध स्टोन क्रेशरविरोधात मनसे आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांकडे कठोर कारवाईची मागणी
Mantha, Jalna | May 24, 2026 जालना जिल्ह्यासह परतूर व मंठा तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८, राज्य महामार्ग तसेच अंतर्गत रस्त्यांच्या परिसरात सुरू असलेल्या अवैध स्टोन क्रेशर व खडीमशीन प्लांटविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकारी जालना यांच्याकडे सविस्तर निवेदन सादर केले आहे. मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी संबंधित प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली आहे. मनसेच्या निवेदनात म्हटले आहे की, जालना जिल्ह्यासह परतूर व मंठा तालुक्यात अनेक स्टोन क्रेशर व क्रेशर प्लांट हे वस्तीजवळ, शा