जालना: पोलिस कर्मचाऱ्यांसाठी संवेदनशीलकरण कार्यशाळा संपन्न; एचआयव्ही/एड्स प्रतिबंध, जनजागृती व समुपदेशनाबाबत मार्गदर्शन
Jalna, Jalna | Sep 5, 2026 पोलिस प्रशिक्षण केंद्र, जालना येथे पोलिस कर्मचाऱ्यांसाठी ‘संवेदनशीलकरण कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले. एचआयव्ही/एड्स प्रतिबंध, जनजागृती तसेच संवेदनशीलता आणि समुपदेशनाच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत पोलिस कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शनिवार दिनांक ४ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेचे आयोजन व नियोजन जिल्हा प्रवेशक राजेश गायकवाड यांनी केले.