धुळे: सलग दुसऱ्या दिवशी एसटी कर्मचाऱ्यांचा संप कायम खाजगी वाहनांच्या बस स्थानकाबाहेर लागल्या रांगा
Dhule, Dhule | Sep 4, 2024 सलग दुसऱ्या दिवशी देखील एसटी कर्मचाऱ्यांचा संप हा कायम असल्याचे दिसून येत असून, सलग दोन दिवसांपासून एसटीचे चाक थांबलेले असल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल देखील होत आहेत, परंतु धुळे मध्यवर्ती बस स्थानकाबाहेर मात्र खाजगी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत, सध्या खाजगी वाहनधारकांची आता चांगलीच चंगळ होत असून मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वाहतूक आता या खाजगी वाहनांमधून होत असल्याने, मध्यवर्ती बस स्थानकाबाहेर आता खाजगी वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या आहेत.