नरखेड: कारला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून पोल्ट्री फार्म चालकावर जीवघेणा हल्ला
Narkhed, Nagpur | May 25, 2026 कारला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून वडेगाव उमरी येथे मध्यरात्री एका पोल्ट्री फार्म चालकावर विटेने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी भाजपा युवा मोर्चाचे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा विद्यमान सरपंच कुणाल रामदास ढबाले आणि त्यांचा चुलत भाऊ सचिन ढबाले यांच्याविरुद्ध नरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गणेश नागपूरहून कोंबड्यांची लस घेऊन घरी परतले