अमरावती: मुंगी मारण्याचे औषध खाल्ल्याने महिलेचा मृत्यू, नागपूरी गेट हद्दीत सबा नगर येथील घटना
मुंगी मारण्याचे औषध खाल्ल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना नागपुरी गेट पोलीस ठाणे अंतर्गत सबा नगर सुन्नी मशीद परिसरात घडली आहे. सबा नगर परिसरात राहणार्या समीना परवीन वहाबोद्दीन (वय ३६) यांनी रविवारी ८ डिसेंबर रोजीऔषधीच्या जागी चुकून मुंगी मारण्याचे पावडर खाऊन घेतले. यामुळे त्यांची प्रकृती बिघडली.नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले जेथे उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला,नागपुरी गेट पोलिसांनी या प्रकरणी ९ डिसेंबर रोजी आकस्मित मृत्यूची नोंद घेतली.