अंबरनाथ: नगर विकास विशेष रस्ता निधीतून जांभिवली गावातील अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करणाऱ्या कामाचे भूमिपूजन
आज बुधवार दिनांक १३ मार्च २०२४ रोजी सकाळी ११ च्या दरम्यान अंबरनाथ पूर्व येथे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या प्रयत्नाने नगर विकास विशेष रस्ता निधीतून जांभिवली गावातील अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करणाऱ्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या वेळी माजी नगरसेवक सचिन पाटील, रविंद्र करंजुले, शिवाजी गायकवाड, विभाग प्रमुख फुलाजी पाटील, उप विभाग प्रमुख रमेश पाटील, शाखाप्रमुख प्रमुख रामदास शिंगावे, बाळा जाधव, विजय सावंत, समाज सेवक संजय मिसाळ सुधीर राऊत अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.