अंबरनाथ: वडवली येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर दर्जेदार ग्रंथालय व वाचनालय लोकार्पण सोहळा
आज दुपारी ५ च्या दरम्यान अंबरनाथ पूर्व येथे कल्याण लोकसभेचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून तसेच आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या प्रयत्नातून वडवली येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर दर्जेदार ग्रंथालय व वाचनालय लोकार्पण सोहळा तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन बांधणे याचा भूमिपूजन सोहळा भंतिजींच्या शुभास्ते संपन्न झाला. हजारो पुस्तकांच्या माध्यमातून ज्ञानाचा साठा ह्या ग्रंथालयात आहे.