अमरावती: अपघातात जखमी झालेल्या 16 वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान डॉ. पंजाबराव देशमुख हॉस्पिटल येथे मृत्यू
अपघातात जखमी झालेल्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलाचा उपचारादरम्यान डॉ. पंजाबराव देशमुख हॉस्पिटल अमरावती येथे 6 डिसेंबर रोजी मृत्यू झाला. भूषण निलेश झोड (16 वर्ष) राहणार बैतूल मध्यप्रदेश असे मृत मुलाचे नाव आहे.मोर्शी तालुक्यातील सालबर्डी जवळ अपघातात जखमी झाल्याने 5 डिसेंबर रोजी साडेअकरा वाजता त्याला डॉ.पंजाबराव देशमुख रुग्णालयात भरती करण्यात आले होते.येथे उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला.या घटनेची नोंद गाडगे नगर पोलिसांनी घेतली आहे,अशी माहिती 7 डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजता प्राप्त झाली.