पनवेल: चार खून केलेत, पुढचा नंबर तुझा; लोकलमधील धमकीने प्रवासी हादरले
Panvel, Raigad | Jul 3, 2026 मुंबई उपनगरीय रेल्वेतील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) कडे जाणाऱ्या लोकलमध्ये मद्यधुंद अवस्थेतील एका प्रवाशाने धिंगाणा घालत सहप्रवाशांना शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर, मी चार खून केले आहेत, पुढचा नंबर तुझा आहे, अशी धमकी दिल्याने डब्यात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.