रामटेक: लोधा जंगल शिवारात महिनाभरानंतर आढळला एका वृद्धाचा कुजलेला मृतदेह
Ramtek, Nagpur | Jun 14, 2026 देवलापार जवळच्या दुलारा येथे राहणारे गोपीचंद भैय्यालाल खंडाते वय 63 वर्ष हे मागील बारा मे रोजी दुपारी घरून निघून गेले होते. त्यांचा सर्वत्र शोध घेतल्यानंतर ते सापडले नसल्याने अखेर पोलीस स्टेशन देवालापार येथे हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. अशातच शनिवार दिनांक 13 जूनला देवलापार प्रादेशिक वनपरिक्षेत्रातील लोधा जवळच्या जंगलात त्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याची माहिती रविवारी सकाळी देवालापार पोलिसांनी दिली.