रामटेक: देवलापार पोलिसांनी चार तासात केला बकरा चोरीचा गुन्हा उघड; एक आरोपी अटकेत
Ramtek, Nagpur | Jul 31, 2026 देवलापार पोलिसांनी बकरा चोरीच्या एका प्रकरणात तत्परता दाखवत चार तासात एका बकरा चोराला तीस जुलैला अटक केली आहे.आरोपीचे नाव नितीन सोनलाल भलावी वय छत्तीस वर्षे राहणार मोहगाव( यादव) तालुका कुरई जिल्हा सिवनी मध्य प्रदेश असे असून चौकशी दरम्यान त्यांनी गुन्हा कबूल केला आहे.