
तहसील कार्यालय धाराशिव चा दुष्काळजन्य परिस्थितीत बळीराजासाठी अभिनव उपक्रम
आत्महत्या नाही, नव्या आशेची वाट — बळीराजाला अडचणीत संवेदनशील प्रशासनाची साथ!
दुष्काळी परिस्थितीत धाराशिव तालुक्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आणि शेतकऱ्यांना मानसिक, आर्थिक व सामाजिक आधार देण्यासाठी धाराशिव तहसील कार्यालयामार्फत “ बळीराजा नवचेतना अभियान” अशा नावाने मोहीम आम्ही सुरू करत आहोत
या मोहिमेचा मुख्य उद्देश केवळ शासकीय योजनांची माहिती देणे नसून, संकटात असलेल्या शेतकऱ्यापर्यंत वेळेत सर्व शासकीय योजना पोहोचणे, त्यांच्या अडचणी ऐकून घेणे, अडचणी सोडविण्यासाठी सर्वांगीण मदत करणे आणि त्यांचे मनोबल खचू न देणे हा आहे
* मोहिमेची प्रत्यक्ष वैशिष्ट्ये
1. तहसीलदार धाराशिव यांचा वैयक्तिक शेतकऱ्यांशी गावात जाऊन अनौपचारिक गाव संवाद
-गृहभेट पथक-
मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी , सहाय्यक कृषी अधिकारी महसूल सेवक , आशा ताई, अंगणवाडी ताई आणि स्थानिक युवक युवती यांचे पथक तयार करणे. सदर पथकांनी
कर्जबाजारीपणा, पीक नुकसान, कौटुंबिक अडचणी किंवा तीव्र मानसिक तणावात असलेल्या शेतकऱ्यांशी वैयक्तिक संवाद साधणे.
गरजेनुसार नियमित गृहभेट व पाठपुरावा करणे.
२. एक खिडकी शेतकरी मदत केंद्र -
. केवळ समुपदेशन करून थांबू नये; आर्थिक, कौटुंबिक, कृषी व सामाजिक अडचणींच्या निराकरणासाठी संबंधित यंत्रणेशी जोडावे.
-संकटातील शेतकऱ्यांसाठी गोपनीय मदत व समुपदेशन व्यवस्था.
-आर्थिक व शासकीय योजनांच्या अडचणी सोडविण्यासाठी विशेष मदत कक्ष.
-दुष्काळग्रस्त गावांमध्ये पाणी, चारा व रोजगारविषयक समन्वय-
3.तहसील कार्यालय धाराशिव येथे दुष्काळ उपाय योजना तालुका नियंत्रण कक्षाची स्थापना आणि तालुकास्तरीय दुष्काळ निवारण उपाय योजना समिती तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली गठित करणे
- नियंत्रण कक्षात गाव निहाय समस्या नोंदवही आणि संबंधित तालुका विभागांशी समन्वय यंत्रणा बळकट करणे
- सदर नियंत्रण कक्षात तालुक्यातील गाव निहाय पाणीसाठा यांची उपलब्धता, चारा उपलब्धता, संभाव्य टँकर बोर अधिग्रहण , शेतकऱ्यांच्या अनुदान, पिक विमा संदर्भातील अडचणी, कर्जमुक्ती योजना संदर्भातील अडचणी, सावकार आणि इतर कर्ज वसुली तगादा बाबतीतील तक्रारी, agristack योजना संदर्भातील माहिती आणि इतर अनुषंगिक अडचणी यांची तत्परतेने नोंद केल्या जाईल आणि योग्य तो समन्वय संबंधित यंत्रणांशी केल्या जाईल
-प्रत्येक प्रकरणात मदत मिळेपर्यंत जबाबदार अधिकाऱ्याकडून पाठपुरावा, विविध सामाजिक संस्थांशी समन्वय
यासाठी गावनिहाय कृती आराखडा, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या, संपर्क नोंदवही, गृहभेट फॉर्म आणि मासिक तालुकास्तरीय आढावा
तहसीलदार धाराशिव कार्यालयामार्फत संपूर्ण तालुक्यात राबविता येईल असा “बळीराजा नवचेतना अभियान — शेतकऱ्याच्या सोबत प्रशासन” हा कृती आराखडा खालील प्रमाणे असेल
यामध्ये शेतकरी आत्महत्या प्रतिबंध, दुष्काळ निवारण, आर्थिक अडचणींचे निराकरण, मानसिक आधार आणि शासकीय यंत्रणांचा समन्वय या सर्व बाबींचा समावेश असेल.
मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला केवळ माहिती देऊन सोडायचे नाही, तर त्याच्या समस्येवर प्रत्यक्ष कार्यवाही होईपर्यंत पाठपुरावा करायचा.
प्रस्तावित तालुकास्तरीय प्रशासकीय मोहीम
मुख्य उद्दिष्टे
संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांपर्यंत वेळेत पोहोचणे.
पात्र शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे.
मानसिक तणावाची चिन्हे ओळखून तज्ज्ञ मदत उपलब्ध करून देणे.
दुष्काळ, कर्ज, पीक नुकसान आणि रोजगाराच्या प्रश्नांवर समन्वित कार्यवाही करणे.
-
प्रस्तावित यंत्रणा
अध्यक्ष: तहसीलदार
समन्वय: नायब तहसीलदार व मंडळ अधिकारी
क्षेत्रीय पातळी: ग्राम महसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, सहायक कृषी अधिकारी
सहकार्य: सर्व तालुकास्तरीय विविध विभाग प्रमुख ,प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम, बँका, पंचायत समिती व ग्रामपंचायत व इतर शासकीय व निमशासकीय यंत्रणा जसे की शिक्षण विभाग सामाजिक न्याय विभाग
योजनेचे स्वरूप व कार्यवाही
ग्रामस्तरीय समिती जसे की ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी , एक शिक्षक, ग्रामपंचायत मधील सरपंच - उपसरपंच ,तंटामुक्ती अध्यक्ष व गावातील सुशिक्षित व आधुनिक शेतकरी यांची एक समिती स्थापन करण्यात येईल सदर समितीमार्फत प्रत्येक गावातील प्रतिकूल परिस्थिती असलेल्या शेतकरी कुटुंबाला भेट देऊन संवाद साधला जाईल. सदर समितीमार्फत शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये जाऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यासह कुटुंबातील सदस्य यांचेसोबत अडचणी बाबत चर्चा करण्यात येईल सदर चर्चेमध्ये खालील प्रश्नाबाबत विचारणा करून त्याचे निराकरण करण्यात येईल
1..दुष्काळी अनुदान मिळाले आहे काय- ग्राम महसूल अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी यासंदर्भात पाठपुरावा करतील.
2. पिक विमा मिळाला आहे काय- सहाय्यक कृषी अधिकारी याबाबत पाठपुरावा करतील
3. घरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे काय आणि विविध ग्रामस्तरीय योजनांचा लाभ- ग ग्रामविकास अधिकारी याबाबत पाठपुरावा करतील
4. मुलांच्या शिक्षणाबाबत कोणत्या संस्थेकडून फी साठी तगादा लावला आहे काय- गावातील एक शिक्षक याबाबत पाठपुरावा करतील
5. रोजच्या जीवनामध्ये अन्नधान्याचा पुरवठा होत आहे काय- गावातील रेशन दुकानदार याबाबत पाठपुरावा करतील
6. कोणत्या बँकेचे कर्ज आहे का व असल्यास बँकेकडून वसुलीसाठी तगादा केला जात आहे का - ग्राम महसूल अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी याबाबत पाठपुरावा करतील
7. शासनाच्या विविध योजना जसे की संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना लाडके बहिण योजना व इतर योजनांचा लाभ मिळतो काय मिळत नसेल तर तो मिळवून देण्यासाठी- ग्रामविकास अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी गावातील अशा पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी पाठपुरावा करतील
8. घरी गुरेढोरे आहेत काय असल्यास त्यांना चारापाणी ची व्यवस्था आहे काय- याबाबत सहाय्यक कृषी अधिकारी पाठपुरावा करतील
9. कुटुंबात कोणाला आरोग्यविषयक समस्या आहे काय- याबाबत आशाताई पाठपुरावा करून शासकीय योजना मार्फत मोफत उपचाराची व्यवस्था करतील
10. कुटुंबात इतर आर्थिक अडचण जसे की मुलीचे लग्न दवाखाना किंवा इतर याबाबत अडचणी असल्यास- एखाद्या स्वयंसेवी संस्थांना याबाबत कळवून मदत उपलब्ध करून देता येईल
11. पीक कर्ज माफ झाल्याचा लाभ मिळाला आहे काय- याबाबत संबंधित ग्रामस्तरीय कर्मचारी पाठपुरावा करतील
याशिवाय प्रत्येक गावामध्ये ग्रामस्तरीय नोडल अधिकारी गावात एक बैठक घेऊन गावासाठी प्रबोधन करतील अशा प्रबोधनांमध्ये मानसोपचार तज्ञ व्यसनमुक्ती, शेतकरी आत्महत्या प्रतिबंध अशा विविध विषयावर प्रबोधन करतील त्यामध्ये एखाद्या शाळेचा सहभाग घेऊन पथनाट्य कार्यक्रम , एखाद्या कीर्तनकार यांना सोबत घेऊन प्रबोधन ,एखाद्या आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील सदस्याचे मार्गदर्शन, यांचे आयोजन करता येईल
अभियानाचा मुख्य सिद्धांत: “ शेतकऱ्यांशी वैयक्तिक संवाद साधा, आगामी संकट ओळखा, आवश्यक ती तातडीची मदत द्या आणि समस्येचे समूळ निराकरण होईपर्यंत पाठपुरावा करा. दुष्काळ संदर्भात केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता दुष्काळ निवारणासाठी आणि दुष्काळाला समर्थपणे तोंड देण्यासाठी धाराशिव तालुक्यातील प्रत्येक गावाचा सर्वांगीण दुष्काळ निवारण आराखडा बनविण्यासाठी प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधून नागरिक केंद्री आराखडा बनवण्यासाठी आम्ही तालुक्याची संपूर्ण यंत्रणा प्रयत्न करणार आहोत" - डॉ मृणाल जाधव तहसीलदार धाराशिव
Dharashiv, Dharavshiv | Oct 18, 2026