गडचिरोली पोलिसांची घरफोडी प्रकरणात प्रभावी कारवाई
गडचिरोली येथील माऊली मोबाईल शॉपमध्ये झालेल्या घरफोडी प्रकरणी गडचिरोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
दिनांक 24 मे 2026 रोजी अज्ञात आरोपींनी दुकानाचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश करत विविध कंपनीचे 09 मोबाईल हँडसेट, मोबाईल अॅक्सेसरीज व रोख रक्कम असा एकूण ₹98,690 किंमतीचा मुद्देमाल चोरी केला होता.
फिर्यादी श्री. अनिरुद्ध दिकोंडवार यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन गडचिरोली येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकाकडून सखोल तपास सुरू आहे.
गुन्हेगारांना कायद्याच्या कचाट्यात आणण्यासाठी गडचिरोली पोलीस दल कटिबद्ध आहे.
#GadchiroliPolice #CrimeDetection #PoliceAction #LawAndOrder
@dgpmaharashtra @mramesh_ips