बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोरटा जेरबंद!
वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेत देगलूर पोलिसांनी नियोजनबद्ध सापळा रचून मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले.
या कारवाईत —
🔹 10 चोरीच्या मोटारसायकली जप्त
🔹 ₹4.10 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
🔹 01 आरोपी ताब्यात; अन्य एकाचा शोध सुरू
🔹 जप्त दुचाकींपैकी देगलूर व कंधार पोलीस ठाण्यातील चोरीच्या गुन्ह्यांशी संबंधित दुचाकी निष्पन्न
⚠️ कमी किमतीच्या वाहनाच्या मोहात पडू नका!
वाहन खरेदी करण्यापूर्वी त्याची कागदपत्रे, मालकी हक्क आणि कायदेशीर स्थितीची पडताळणी अवश्य करा.
वाहन चोरीविरोधात नांदेड पोलिसांची विशेष मोहीम सुरूच!
#nandedpolice #deglurpolice #maharashtrapolice #policeaction #vehicletheft