Hingoli: हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरात कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसानेच कायद्याची धज्जी उडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नांदेड पोलीस दलात कार्यरत असलेल्या प्रशांत गजभारे या पोलीस कर्मचाऱ्याने पहिली पत्नी हयात असताना आणि कोणताही घटस्फोट झालेला नसताना 'ड्युटीवर जात आहे' असे खोटे सांगून वसमतमधील कृष्णा मंगल कार्यालयात गुपचूप दुसरे लग्न करण्याचा घाट घातला. मात्र, याची माहिती मिळताच पहिली पत्नी थेट लग्नमंडपात पोहोचली आणि तिने जाब विचारला. यावर संतापलेल्या आरोपी पोलीस पतीने आजूबाजूच्या लोकांसमोरच तिला अमानुष आणि बेदम मारहाण केली. तिथले लोक मात्र मदतीऐवजी फक्त बघ्याची भूमिका घेत राहिले. या भयानक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, नेटकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी वसमत शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
.
#hingoli #hingolinews #vasmat #viralpost #iblisnews