गडचिरोली पोलीसांची अवैध दारुविरोधात मोठी कारवाई
गडचिरोली पोलीसांनी अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करत देशी-विदेशी दारू, हातभट्टी मोहा दारू तसेच ३ चारचाकी व १ दुचाकीसह एकूण ₹26,25,900 किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
कारवाईदरम्यान २ आरोपींना अटक करण्यात आली असून १ आरोपी फरार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
जून २०२६ मधील विशेष मोहिमेचा आढावा :
• अवैध दारू विक्री व वाहतूक प्रकरणी २८७ गुन्हे दाखल
• ₹१.९४ कोटींहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त
अवैध व्यवसायांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गडचिरोली पोलीस कटिबद्ध आहेत.
#GadchiroliPolice #IllegalLiquor #LawAndOrder #SafeGadchiroli #maharashtrapolice