अवैध दारू निर्मिती, साठवणूक, वाहतूक किंवा विक्रीबाबत कोणतीही माहिती आमच्या नव्याने स्थापन करण्यात आलेल्या अवैध दारूविरोधी पथकाला [Anti-Bootlegging Cell] तात्काळ कळवा. प्रत्येक माहितीवर युद्धपातळीवर कारवाई करून अवैध व्यवसाय व त्यासाठी उभारलेल्या संरचना उद्ध्वस्त करण्यात येतील.
📞 अवैध दारूविरोधी पथक : ७७ ९८ १०० ११२
गेल्या ३ वर्षांपासून आमची पथके अशा अवैध व भेसळयुक्त दारूच्या अड्ड्यांवर सातत्याने कारवाई करून त्यांचे जाळे उद्ध्वस्त करीत आहोत. मात्र, भविष्यात अशा कोणत्याही दुर्दैवी घटना टाळण्यासाठी जमिनीवरील आमचे डोळे आणि कान म्हणून तुम्हीही महत्त्वाची भूमिका बजावू शकता. तुमची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल.
तुमची एक टीप, एखादा जीव वाचवू शकते. 🙏
#PCCityPolice
Pune, Maharashtra | Jun 3, 2026