Hingoli News : हिंगोली जिल्ह्यात दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेले मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्रकार परिषदेत एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला.
पत्रकारांनी राजकीय प्रश्नांऐवजी थेट शेतकऱ्यांच्या समस्यांवर प्रश्न विचारावेत, असा आग्रही सूर येथील शेतकऱ्यांनी लावला. संजय राऊत किंवा विरोधकांच्या विधानांवर चर्चा करण्यापेक्षा मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या दुःखाविषयी प्रश्न विचारा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
.
#hingoli #chandrashekharbawankule #hingolinews #marathwada #iblisnews
Aundha Nagnath, Hingoli | Sep 28, 2026