11 वर्षांपासून खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या नक्षल समर्थक आरोपी बापू व्यंकटी जनगम (रा. नडीकुडा) यास गडचिरोली पोलीसांनी अटक केली.
खून, खुनाचा प्रयत्न आणि शासकीय सेवकावर हल्ला यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपीचा सहभाग होता. गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन असरल्लीच्या पथकाने नियोजनबद्ध कारवाई करून आरोपीस ताब्यात घेतले.
गडचिरोली जिल्ह्यात शांतता, सुरक्षा आणि कायद्याचे राज्य कायम राखण्यासाठी पोलीस दल कटिबद्ध आहे.
#GadchiroliPolice #AntiNaxalOperation #LawAndOrder #PublicSafety #MaharashtraPolice Gadchiroli