Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Jharkhand
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh
Haryana
मंत्री

"अनाथ विशाखाला मिळाला आधार" "सचिन केंद्रे यांनी घेतली शिक्षणाची जबाबदारी" जळकोट | प्रतिनिधी डोंगर कोनाळी येथील कै. श्रीदेवी बालाजी गव्हाणे यांच्या दुःखद निधनानंतर पोरकी झालेल्या त्यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी सामाजिक व राजकीय कार्यकर्ते *सचिन केंद्रे* यांनी स्वीकारली आहे. कै. श्रीदेवी यांचे 12 जून रोजी निधन झाले होते. त्यानंतर गव्हाणे कुटुंबाच्या सांत्वनासाठी गेले असता सचिन केंद्रे यांनी कै. श्रीदेवी यांची मुलगी *कु. विशाखा गव्हाणे* हिच्या शिक्षणाबाबत चौकशी केली. विशाखा सध्या उदगीर येथील *'इच्छापूर्ती कोचिंग क्लासेस'* मध्ये प्रा. *सिद्धेश्वर पटणे* सरांकडे 12वीची खाजगी शिकवणी घेत असल्याचे समजले. आई-वडील दोघेही नसल्याचे समजताच सचिन केंद्रे यांनी तत्परतेने क्लासला भेट देऊन विशाखाची *संपूर्ण वार्षिक फी स्वतः जमा केली*. तसेच यापुढेही तिच्या शैक्षणिक व इतर खर्चासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या प्रसंगी प्रा. सिद्धेश्वर पटणे यांनी देखील सामाजिक भान राखत विशाखाच्या फीमध्ये *मोठी सवलत* देऊन या उपक्रमास सहकार्य केले. यावेळी बोलताना सचिन केंद्रे म्हणाले, _"शिक्षण हाच समाज बदलण्याचा खरा मार्ग आहे. विशाखासारख्या हुशार मुलीचे शिक्षण पैशाअभावी थांबू नये, यासाठी आम्ही नेहमीच तिच्या पाठीशी उभे राहू."_ सचिन केंद्रे यांच्या या कार्याचे डोंगर कोनाळी व परिसरातील ग्रामस्थांनी कौतुक केले आहे. _"आजच्या काळात शब्दाला जागणारे आणि तळमळीने काम करणारे लोकप्रतिनिधी दुर्मिळ आहेत. सचिन केंद्रे यांच्यासारखे नेते समाजाला नक्कीच प्रेरणा देतील"_, अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.

Latur, Latur | Aug 5, 2026

MORE NEWS