
पुण्यात खळबळ! "पूजा केली नाही तर मुलगा फाशी घेईल"; करणीची भीती दाखवून भोंदू बाबाने दाम्पत्याकडून उखळले ३.९० लाख रुपय...
पुणे : करणी, अघोरी शक्ती आणि अनिष्ट घटनांची भीती दाखवून एका महिलेची व तिच्या मुलाची तब्बल ३ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार लोहगाव परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी लोहगाव पोलिसांनी नाशिकमधील भोंदू बाबा आणि त्याच्या पत्नीविरुद्ध महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट आणि अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५३ वर्षीय फिर्यादी महिलेची आरोपी कमलेश शिवकुमार अधिकारी आणि त्याची पत्नी गौरी कमलेश अधिकारी यांच्याशी ओळख झाली होती. आरोपींनी महिलेच्या कुटुंबावर करणी झाल्याचा दावा करत, “अघोरी पूजा केली नाही तर तुला वेड लागेल आणि तुझा मुलगा फाशी घेईल,” अशी भीती तिच्या मनात निर्माण केली.
या भीतीचा फायदा घेत आरोपी दाम्पत्याने विविध धार्मिक विधी, अघोरी पूजा आणि अनुष्ठानांच्या नावाखाली महिलेकडून मोठी रक्कम उकळली. डिसेंबर २०२३ ते जून २०२४ या कालावधीत लोहगाव, उज्जैन, नाशिक, जेजुरी आणि कोलकाता येथे कथित पूजा व धार्मिक विधी करण्याचे सांगून आरोपींनी तब्बल ३ लाख ९० हजार रुपये घेतल्याचा आरोप आहे.
.
.
.
#PuneNews
#Lohegaon
#PuneCrime
#NashikNews
#पुणेन्यूज
#पुणेगुन्हेगारी
#Bhondubaba
#AntiSuperstitionLaw
#FraudCase
#Jadutona
#CheatingCase
#जादूटोणाविरोधीकायदा
#भोंदूबाबा
Haveli, Pune | Jun 3, 2026