
बाभळगाव-राजीव गांधी चौक रिंग रोडवर जुगार अड्डा उद्ध्वस्त, LCB ने 10 जणांना ठोकल्या बेड्या
लातूर, दि. 1 ऑक्टोबर 2026 -लातूर शहरातील बाभळगाव चौक ते राजीव गांधी चौकाला जोडणाऱ्या रिंग रोड परिसरात सुरू असलेला जुगार अड्डा स्थानिक गुन्हे शाखेने उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईत 10 जणांना अटक करण्यात आली असून 72 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास रिंग रोडवरील गोजमगुंडे मंगल कार्यालयाच्या बाजूला लगजकर यांच्या शेतातील झाडीमध्ये तिर्रट जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती LCB पथकाला मिळाली होती. खात्री करून पंचांसह सायंकाळी 5.30 वाजता छापा टाकला असता दोन रिंगणात 10 जण जुगार खेळताना आढळले. यावेळी हसन शेख रा. लातूर हा एक जण फरार झाला.
पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम आणि जुगाराचे पत्ते जप्त केले आहेत.
अटक आरोपी - 1) अमजद बाबू पठाण, वय 32, रा. सम्राट चौक, वडार गल्ली 2) वैजनाथ नागनाथ काळे, वय 35, रा. आनंद नगर, तानाजी चौक 3) बलदेव रामसिंग बावरी, वय 32, रा. वीर हणमंतवाडी, मार्केट यार्ड 4) बबलू सुरेश गायकवाड, वय 33, रा. बौद्धनगर 5) शिवा बाबुसिंग बावरी, वय 27, रा. वीर हणमंतवाडी 6) सिद्धार्थ संजय सिरसाट, वय 26, रा. बौद्धनगर 7) जमीर गौस बागायन, वय 24, रा. शाहुअली मोहल्ला, साठफुटी रोड 8) नवीन रविंद्र लोंढे, वय 28, रा. सम्राट चौक 9) अजय आनंद कांबळे, वय 25, रा. बौद्धनगर 10) याजीद हाकानी शेख, वय 34, रा. बरकतनगर (सर्व रा. लातूर) व फरार आरोपी हसन शेख रा. लातूर.
यांच्या विरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने, पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे, पोलीस अंमलदार युवराज गिरी, विनोद चलवाड, मोहन सुरवसे, प्रदीप स्वामी, राहुल कांबळे, जमीर शेख, प्रेमदास राठोड, प्रविण कोळसुरे, तुळशीराम बरुरे यांनी केली आहे.
Latur, Latur | Oct 4, 2026