ऊस वाहतुकीचा ट्रक दरीत कोसळून पेटला !
आष्टी जवळील शृंगेरी घाटात 3 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास उसाचा मोकळा ट्रक (MH 42 B 8583) ब्रेक फेल झाल्यामुळे खोल दरीत कोसळल्याची भीषण घटना घडली...
अपघातानंतर ट्रकने पेट घेतल्याने आगीचे भयानक लोळ उठले होते.. ट्रकच्या आगीमुळे परिसरातील डोंगरालाही आग लागल्याची माहिती आहे.. या दुर्घटनेत चालक सागर सोमनाथ इंदलकर यांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे.. घटनास्थळी आष्टी पोलिसांनी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे..