समुद्रपूर: सांडस शिवारात वाघ नजर ठेवण्यासाठी लावले ट्रॅप कॅमेरा अज्ञात चोरट्याने नेला चोरून
समुद्रपुर तालुक्यातील गिरड परीसरात वाघांचे वाढते मुक्त संचार लक्षात घेऊन वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे यांच्या आदेशाने वनविभागाच्या वतीने या वाघांकडून जनावरांवर किवा माणसावर हल्ला होऊ नये याची दक्षता या वाघांवर नजर ठेवण्यासाठी अनेक ठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले आहे.यापैकी सांडस शिवारात वाघांवर नजर ठेवण्यासाठी लावण्यात आलेला ट्रॅप कॅमेऱ्याची पाहणी करण्यासाठी वनरक्षक पि.डी बेले हे याठिकाणी गेले असता त्यांना लावलेला ट्रॅप कॅमेरा अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे निदर्शनास आले.