समुद्रपूर: विविध झॉकीयासह श्रीराम मंदिरातून निघाली श्रीरामप्रभुची सुप्रसिद्ध घोडा रथयात्रा:आमदार कुणावार यांनी केली रथाचे पुजन
गिरड येथिल सुप्रसिद्ध श्रीराम देवस्थानाच्या वतीने गेल्या १३९ वर्षापासून श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने घोडा रथयात्रा काढण्याची परंपरा निरंतर कायम परंपरेनुसार श्रीराम मंदिरातुन भव्य प्रसिध्द घोडो याञा काढण्यात आली.यावेळी पुरातन लाकडी रंथावर घोडा व त्यावर प्रभुरामचंद्राची लाकडी मूर्ती समोर दोन मातीचे शिपाई विराजमान करून विधीवत पुजा अर्चना करून दोराच्या सहाय्याने थर ओढण्यात आला. यावेळी आमदार समिरभाऊ कुणावार यांनी रथाची पुजा केली.