समुद्रपूर: उमेरी येथे सुरू असलेल्या कुक्कुटपालनाची परवानगी रद्द करा: माजी सरपंच किशोर नेवल: अधिकाऱ्यांनी केले चौकशी
चिखल ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या उमरी येथिल कुक्कुटपालनामुळे नागरीकांना विविध नाहक त्रासाला समोर जावे लागत आहे.या सुरू असलेल्या कुक्कुटपालनाची परवानगी रद्द करण्याची मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच मनीषा माहुरे माजी सरपंच किशोर नेवल यांनी आमदार समिरभाऊ कुणावर, प्रदुषण नियंत्रण बार्ड नागपूर, तहसीलदार हाटकर गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली होती.यासंबंधी आमदार समिरभाऊ कुणावार यांनी आरोग्य संबधी उद्भवत असलेल्या समस्या लक्षात घेऊन अधिकाऱ्यांना चौकशीच्या सुचना दिल्या होत्या